रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

पु.ल.एक साठवण

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचा जन्मदिन त्यानिमित्त त्यांच्याच साहित्यकृतीतून त्यांना विनम्र अभिवादन.


पु.ल.एक साठवण



बटाट्याच्या चाळीत

अपूर्वाई झाली.

एका कोळियाने वाऱ्या

वरची वरात काढली.

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

शुद्ध शब्द

 ष्ट  शेवटी असणारे शब्द.

 शिष्ट, विशिष्ट, चविष्ट, कोपिष्ट, परिशिष्ट, उद्दिष्ट, नादिष्ट, अनिष्ट, आकृष्ट, एकसष्टी, स्पष्ट, निकृष्ट, सर्वोत्कृष्ट.


ष्ठ शेवटी असणारे शब्द.

ज्येष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ, वसिष्ठ, गर्विष्ठ, पृष्ठ, निष्ठा, प्रतिष्ठा, पराकाष्ठा, घनिष्ठ, बलिष्ठ, षष्ठी.


स्र असणारे शब्द.

अजस्र, हिंस्र, सहस्र, स्रोत, रक्तस्राव,ऋतुस्राव.

ऊन, वून प्रत्यय कधी लावावेत

एकाक्षरी धातूला ऊन प्रत्यय लावतात. वून नाही.

खा - खाऊन,     खावून❎

घे -  घेऊन,     घेवून ❎

ये -   येऊन      येवून❎

गा -  गाऊन     गावून❎

पि -  पिऊन     पिवून❎

हो -  होऊन

ने -   नेऊन

भि  -  भिऊन


ज्या धातूच्या शेवटी व असतो त्या धातूला ऊन प्रत्यय लावताना तो वून असा लावला जातो.

धाव +ऊन (परूप संधीने)=धावून

ठेव - ठेवून,  ठेऊन❎

स्त्रीलिंगी नावांचे लेखन

अंबिका

अदिती

अनसूया

अपूर्वा

अमिता

अमिषा

अरुंधती

अश्विनी

अहल्या

इंदुमती

इरावती

ईशा

उज्ज्वला

उमा

उल्का

ऋतुजा

कमलिनी

कलिका

कविता

कार्तिकी

कीर्ती

कुंदा

कुसुम

गिरिजा

गीता

चारुशीला

जुईली

ज्योती

तितिक्षा

दीपा

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

थांब पावसा...

नको,नकोरे पावसा

येवढाही नको पडू,

तुझ्या पडण्याने किती

डोळे लागलेत रडू।।

                                   धरतीच्या लेकरांची

                                    जगण्याची आशा तू,

                                   जीवन जीवां देणारा

                                कृपावंत दाता तू,

                                    अवकृपा तुझी अशी

                                   नको देऊरे पडू।।

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

पुल्लिंगी नावांचे लेखन

अंकित

अंकुर

अंकुश

अक्रूर

अच्युत

अरुण

अतुल

अनिकेत

अजित

अभिजित

अभिमन्यू

ऋतुराज

अभिषेक

अरिहंत

अनिल

अवधूत

आविष्कार

कवीश

इंद्रजित

ॐकार

अमित

ओम् कार

उन्मेष

आशिष

कवीश

कार्तिक

किरण

कौशिक

निषाद

नीलकंठ

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

शब्दातील ऱ्हस्व व दीर्घ इकार व उकार यांचा संभ्रम असणाऱ्या शब्दांचे लेखन.

अमित

अनसूया

अबीर

अंकित

अंकुर

अचूकपणा

अंधूक

अघटित

अडीच

अतिथी

अद्भुत

अधिक

अधीक्षक

अधीश

अनुभूती

अभूतपूर्व

अमिष

अमीर

अमुक

अर्जित

अलगूज

अक्रीत

आगेकूच

अहेर

अतीत

आजूबाजू

इंजीन

आधारित

आमूलाग्र

उंदीर

रविवार, २६ जुलै, २०२०

चित्रपट- श्यामची आई

    'पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे.'
    "ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुचे हाती,
     ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती.''
            या उक्ती ज्या पुस्तकाला तंतोतंत लागू ठरतात,गेली८४ वर्षे मराठी साहित्य नि मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पुस्तक म्हणजे संस्काराचा अमृतकुंभ,मातृप्रेमाचे महन्मंगल स्रोत 'श्यामची आई.'सानेगुरुजी नि श्यामची आई ही नावे ऐकली नाहीत असा मराठी माणूस असेल असे मला वाटत नाही. याच पुस्तकावर बहुआयामी व्यक्तिमत्त्व, साहित्य सम्राट आचार्य अत्रेंनी श्यामची आई चित्रपट निर्माण केला.त्याविषयी थोडेसे..
  
             मराठीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेता पहिला चित्रपट.आचार्य अत्रेंनी तन,मन,धन ओतून निर्माण केलेला हा चित्रपट.दामुण्णा जोशी, वनमाला नि बालकलाकार माधव वझे यांच्या प्रमुख भूमिका. 'छडी वाजे छमछम, भरजरीग पितांबर दिधला आणून, आई म्हणून कोणी' ही गाणी आजही मराठी मनाचा ठाव घेतात.