नको,नकोरे पावसा
येवढाही नको पडू,
तुझ्या पडण्याने किती
डोळे लागलेत रडू।।
धरतीच्या लेकरांची
जगण्याची आशा तू,
जीवन जीवां देणारा
कृपावंत दाता तू,
अवकृपा तुझी अशी
नको देऊरे पडू।।
येण्याची तुझ्या किती
केली होती रे प्रतिक्षा,
तुझ्या येण्यावर होती
आमची उद्याची आशा,
उरी घेऊन निराशा
सांग आता कसे लढू।।
तुझ्या अशा येण्याने
पाणी झाले सारे रानी,
शेतकऱ्याच्या तोंडचे
तू पळवले पाणी,
कोरोनाच्या साथीने
आधीच होता घास कडू।।
लेकरापरी सांभाळलेली
उभी दोलत वाहू दे,
उद्या राबण्याला आम्हा
रानी मातीतरी राहू दे,
मातीत जाईतो आम्ही
त्या मातीत लढू,
तुझ्या पडण्याने किती
डोळे लागलेत रडू।।
- राजेंद्र कणसे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा