एकाक्षरी धातूला ऊन प्रत्यय लावतात. वून नाही.
खा - खाऊन, खावून❎
घे - घेऊन, घेवून ❎
ये - येऊन येवून❎
गा - गाऊन गावून❎
पि - पिऊन पिवून❎
हो - होऊन
ने - नेऊन
भि - भिऊन
ज्या धातूच्या शेवटी व असतो त्या धातूला ऊन प्रत्यय लावताना तो वून असा लावला जातो.
धाव +ऊन (परूप संधीने)=धावून
ठेव - ठेवून, ठेऊन❎
लाव - लावून, लाऊन❎
जेव - जेवून.
काव - कावून.
चाव - चावून.
शिव - शिवून.
गोव - गोवून.
लव - लवून.
( ऊन किंवा वून प्रत्यय लावताना त्या शब्दातील धातू शोधावा धातूच्या शेवटी व असेल तर वून प्रत्यय.एकाक्षरी धातू असेल तर ऊन प्रत्यय .)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा