आज मराठी साहित्य शारदेचे सारस्वत, शब्दब्रह्म स्व.प्राचार्य शिवाजीराव भोसलेसर यांची जयंती. तीस वर्षांहून जास्त काळ विविध विषयांसह,महामानवांच्यां जीवनचरित्रांचा जागर आपल्या अमृतवाणीने मांडून वक्तृत्वाचा दीपस्तंभ निर्माण करणारे,'श्रवणेची होती जीभा,शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, माझा मराठाची बोलू कौतुके...' या माऊलींच्या शब्दांची अनुभूती ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्राला आली ते प्राचार्य शिवाजीराव भोसलेसर.
त्यांना ऐकण्याचे,जवळून पाहण्याचे काही सुवर्णक्षण माझ्या आयुष्यात आले.ते क्षण म्हणजे 'आजी म्या देव पाहिला गे माये.'ची अनुभूति देणारे होते.
१९८८ साली त्यांची कर्मभूमी फलटण येथे सरांचां षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा त्यांच्या विद्यार्थी वर्गाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने मारुती कार सरांनां कृतज्ञता भेट म्हणून देण्यात आली होती.त्यावेळी मा.शरदचंद्रजी पवार, लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी,बेळगावचे वयोवृद्ध उद्योगपती रावसाहेब गोगटे हे दिग्गज मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.यासोहळ्यात व्यासपीठावर बोलताना रावसाहेब गोगटे यांनी प्राचार्य भोसले सरांनां साष्टांग दंडवत घातला होता. तोप्रसंग हजारो डोळ्यांनी पाहिला नि कृतज्ञता व्यक्त करण्याचे असामान्य व्यक्तिमत्वाचे असामान्य व्यक्तीसाठीचे असमान्यपण सामान्य माणसांच्या हृदयाला भिडले.
रहिमतपूर येथे व्याख्यानाला सर उभे राहिले तेव्हा समोरील डायस थोडा हलत होता तेव्हा संयोजक तो स्थिर करण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात सर म्हणाले," ज्याला बोलताना आधार घ्यावा लागतो त्याच्या बोलण्याला धार ती काय असणार ?" त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट अजूनही कानात गुंजतो आहे.
२००५-०६ साली अजिंक्यतारा प्राथमिक विद्यालय शेंद्रे येथे स्नेहसंमेलनाला केंद्रप्रमुख सौ. सुजाता कानेटकर यांच्या आग्रहावरून भोसले सर आवर्जून उपस्थित झाले. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे भाग्य त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, माझे मार्गदर्शक श्री. शिवाजीराव कणसे यांच्यामुळे मला मिळाले. आयुष्यातील अनमोल क्षणांपैकी तो एक क्षण. ज्यांच्या वाणी ने उभा महाराष्ट्र अमृतात न्हाहून निघाला त्या शब्द ब्रह्मापुढे माझ्या वाणीचा वाण तो काय असणार ? त्या व्यासपीठावर सरांच्या हस्ते माझा सत्कार झाला .तो सत्कार म्हणजे माझी मर्म बंधातली ठेव आहे. त्यावेळी सर एकच वाक्य बोलले, "एकेलं होतं तुम्हाला, ऐकलं तुम्हाला." त्यांचे ते वाक्य माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार होता व आहे.

आठवता तुमच्या स्मृती
गुंग होऊन जाते मती
दिव्यत्वाची जेथे प्रचती
तेथे कर माझी जुळती.
तेथे कर माझे जुळती.
- राजेंद्र वि. कणसे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा