सोमवार, २० जुलै, २०२०

मराठी भाषेतील काही शब्द उच्चार करताना (अयोग्य उच्चार) नि लेखन करताना वेगळे असतात. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. अशा शब्दांचे योग्य लेखन कोणते ? असा प्रश्न पडतो. असे काही शब्द..


 

अयोग्य शब्द

योग्य शब्द

1

आकरा

अकरा

2

अंमली

अमली

3

अखूड

आखूड

4

अजस्त्र

अजस्र

5

अतताई

आततायी

6

अद्यावत

अद्ययावत

7

अध्यात्मिक

आध्यात्मिक

8

अध्याऋत

अध्याहृत

9

अनुषंगिक

आनुषंगिक

10

अनुवंशिकता

आनुवंशिकता

11

अनुसया

अनसूया

12

अमलबजावणी

अंमलबजावणी

13

अल्पसंख्यांक

अल्पसंख्याक

14

अल्पोपहार

अल्पोपाहर

15

अवतीभवती

आवतीभोवती

16

आक्रीत

अक्रीत

17

आगतिक

अगतिक

18

आघोरी

अघोरी

19

आजिबात

अजिबात

20

आधीन

अधीन

21

अंधःकार

अंधकार

22

उध्वस्त

उद्ध्वस्त

23

आगांतुक

आगंतुक

24

उरफाटा

उफराटा

25

एकादा

एखादा

26

ऋषिकेश

हृषीकेश

27

कवयत्री

कवयित्री

28

कांठळी

कानठळी

29

कायली

काहिली

30

किंमती

किमती

31

कितिंदा

कितीदा

32

कोजागिरी

कोजागरी

33

कोट्यावधी

कोट्यवधी

34

कोट्याधीश

कोट्यधीश

35

गंमती

गमती

36

गंमतीदार

गमतीदार

37

घनःश्याम

घनश्याम

38

चतुःष्कोण

चतुष्कोण

39

चतुःष्पाद

चतुष्पाद

40

चतुरस्त्र

चतुरस्र

41

चातुर्मास

चतुर्मास

42

चिटकलेला

चिकटलेला

43

जम्मत

जंमत

44

जाऊद्या

जाऊ द्या

45

जाज्ज्वल्य

जाज्वल्य

46

जेष्ठ

ज्येष्ठ

47

ज्योतिबा

जोतिबा

48

जोतिर्लिंग

ज्योतिर्लिंग

49

ज्यादा

जादा

50

ज्योस्ना

ज्योत्स्ना

51

ज्या वेळी

ज्यावेळी

52

ज्वालाग्रही

ज्वालाग्राही

53

टेहेळणी

टेहळणी

54

ठराविक

ठरावीक

55

डहाळी

डाहळी

56

तज्ञ

तज्ज्ञ

57

तात्काळ

तत्काळ

58

तात्कालीन

तत्कालीन

59

तात्विक

तात्त्विक

60

तिघेजण

तिघे जण

60

त्याप्रकारे

त्या प्रकारे

62

त्रिंबक

त्र्यंबक

63

दुर्मिळ

दुर्मीळ

64

दुर्वा

दूर्वा

65

दूर्गा

दुर्गा

66

दैदिप्यमान

देदीप्यमान

67

दोघेजण

दोघे जण

68

त्रिंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर

69

दुःखीकष्टी

दुःखिकष्टी

70

दुराभिमान

दुरभिमान

71

दुर्भिक्ष्य

दुर्भिक्ष

72

दुरावस्था

दुरवस्था

73

धिःकार

धिक्कार

74

धुपारती

धूपारती

75

धुवांधार

धुवाधार

76

धृवपद

ध्रुवपद

77

नाही तर

नाहीतर

78

निघूया

निघूया

79

निघृण

निर्घृण

80

निर्भत्सना

निर्भर्त्सना

81

निश्वास

निःश्वास

82

निस्तब्ध

निःस्तब्ध

83

नेत्रदीपक

नेत्रोद्दीपक

84

नेस्तनाबूत

नेस्तनाबूद

85

नैऋत्य

नैर्ऋत्य

86

पशुपतास्त्र

पाशुपतास्त्र

87

पश्चाताप

पश्चात्ताप

88

पहाणी

पाहणी

89

पैलवान

पहिलवान

90

पारंपारिक

पारंपरिक

91

पाश्चात्य

पाश्चात्त्य

92

पाहरेकरी

पहारेकरी

93

पितांबर

पीतांबर

94

पिशाच्च

पिशाच

95

पुनःश्च

पुनश्च

96

पुनर्कथन

पुनःकथन

97

पुनर्प्रक्षेपन

पुनःप्रक्षेपण

98

पृथःकरण

पृथक्करण

99

पोर्णिमा

पौर्णिमा

100

प्रकृतीस्वास्थ

प्रकृतिस्वास्थ्य

101

प्रगट

प्रकट

102

प्रतिथयश

प्रथितयश

103

प्रत्येकवेळी

प्रत्येक वेळी

104

प्रायःश्चित

प्रायश्चित्त

105

फुफ्फुस

फुप्फुस

106

बहुदा

बहुधा

107

बहुसंख्यांक

बहुसंख्याक

108

बुद्ध्यांक

बुद्ध्यंक

109

बुभुःकार

भूपकार

110

बेमान

बेइमान

111

ब्रहस्पती

बृहस्पती

112

बेमुर्वत

बेमुरवत

113

भवती

भोवती

114

भवताली

भोवताली

115

भिवई

भुवई

116

भीडमुर्वत

भीडमुरवत

117

भूतपिशाच्च

भूतपिशाच

118

भूर्दंड

भुरदंड

119

भृकटी

भ्रूकुटी

120

मग्रुरी

मगरुरी

121

मतिथार्थ

मथितार्थ

122

मधे

मध्ये

123

मध्यंतर

मध्यांतर

124

मनःस्ताप

मनस्ताप

125

मनमिळावू

मनमिळाऊ

126

महात्म्य

माहात्म्य

127

महाराष्ट्रीयन

महाराष्ट्रीय

128

माऊली

माउली

129

मातुश्री

मातोश्री

मातृश्री

130

मिष्कील

मिस्कील

मिश्कील

131

मुंजीबंधन

मौंजीबंधन

132

मुगुट

मुकुट

133

मुरंबा

मुरांबा

134

मुष्कील

मुश्कील

135

मेघःश्याम

मेघश्याम

136

म्लेंच्छ

म्लेच्छ

137

येऊद्या

येऊ द्या

138

रक्तस्त्राव

रक्तस्राव

139

लांच्छन

लांछन

140

लौकर

लवकर

141

वक्तृत्त्व

वक्तृत्व

142

वांगनिश्चय

वाङ्निश्चय

143

वारंवारिता

वारंवारता

144

वार्ताहार

वार्ताहर

145

विक्राळ

विकराळ

146

विचाराहःर्य

विचारार्ह

147

विद्यर्थ

विध्यर्थ

148

विस्कळीत

विसकळीत

149

व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्त्व

150

शब्दछल

शब्दच्छ

151

शरदचंद्र

शरच्चंद्र

152

शुचिरभूत

शुचिर्भूत

153

श्रृतिका

श्रुतिका

154

श्रृंगार

शृंगार

155

सुश्रुषा

शुश्रूषा

156

बुद्ध्यांक

बुद्ध्यंक

 

157

 

श्वासोछ्वास

श्वासोश्वास

 

श्वासोच्छ्वास

158

संयुक्तिक

सयुक्तिक

159

षष्ठ्यब्दिपूर्ती

षष्ट्यब्दीपूर्ती

160

संसारिक

सांसारिक

161

सगळेजण

सगळे जण

162

सर्दी

सरदी

163

सर्रास

सररास

164

सर्वजण

सर्व जण

165

सर्वोत्कृष्ठ

सर्वोत्कृष्ट

166

सहस्त्र

सहस्र

167

सृजनशील

सर्जनशील

168

सहाय्य

साहाय्य

169

सहाजिक

साहजिक

170

सात्विक

सात्त्विक

171

सामुग्री

सामग्री

172

सार्वकालीन

सर्वकालीन

173

स्त्राव

स्राव

174

स्त्रोत

स्रोत

175

स्फुल्लिंग

स्फुलिंग

176

हत्त्या

हत्या

177

हरणी

हरिणी

178

हिशेब

हिशोब

179

ह्यावेळी

ह्या वेळी

180

हिम्मत

हिंमत

181

सीमांतपजन

सीमंतपूजन

182

सुग्रण

सुगरण

183

सुतारफेणी

सुतरफेणी

184

सुरवात

सुरुवात

185

सुवाच्च

सुवाच्य

186

सुस्कारा

सुसकारा

187

सोज्वळ

सोज्ज्वळ

188

लेझिम

लेजीम

189

स्त्राव

स्राव

190

स्त्रोत

स्रोत

191

स्फुल्लिंग

स्फुलिंग

192

हत्त्या

हत्या

193

हरणी

हरिणी

194

हिशेब

हिशोब

195

ह्यावेळी

ह्या वेळी

196

हिम्मत

हिंमत

197

रहाणे

राहणे

198

पहाणे

पाहणे

199

तज्ञ

तज्ज्ञ

200

षडाक्षरी

षडक्षरी

२१ टिप्पण्या:

  1. खूप छान आणि कष्टसाद्य काम आहे. लेखन सुधारणेसाठी खूप अपयोगी ठरेल.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. अरुण फडके यांचा शुद्धलेखन शब्दकोश पान नं.१७४ वर सरदी हा शब्द बरोबर दिला आहे.

      मात्र मराठी शुद्धलेखन प्रदीप मूळ लेखक मो.रा.वाळंबे सुधारित आवृत्ती लेखक-संपादक अरुण फडके पानं नं.२१० सर्दी शब्द बरोबर दिला आहे.

      हटवा
  3. खूप छान उपक्रम याच प्रमाणे शब्द वर्ण अक्षराप्रमाणे कसे लावावे याचेही मार्गदर्शन व्हावे

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान


    यांचे शब्द संग्रह असेल तर तो ही द्यावा

    उत्तर द्याहटवा