बुधवार, २० एप्रिल, २०२२

म्हणी, भाषेतील सौंदर्याच्या खाणी.

( स्पर्धा परीक्षा इ. पाचवी व आठवी साठी मराठीमध्ये म्हणी असतात. चार-पाच वर्षापूर्वी म्हणी प्रचलित असणाऱ्या सहज सोप्या ऐकलेल्या, वाचलेल्या अशा असायच्या परंतु हल्ली सराव किंवा मुख्य परीक्षेला येणाऱ्या म्हणी विद्यार्थ्यांच्या वयोगट, आकलन, आशयापलिकडील आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणून प्रचलित म्हणी शिवाय काही म्हणी विद्यार्थ्यांसाठी देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.) 

* अंगावरचे लेणे, जन्मभर देणे. 

* अती झाले गावचे अन् पोट फुगले देवाचे. 

* अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज. 

* अंधारात केले, पण उजेडात आले. 

* अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. 

* अती झाले गावचे अन् पोट फुगले देवाचे. 

*आईची माया अन् पोर जाईल वाया. 

*अडली गाय फटके खाय. 

*अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का? 

*अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. 

*अति खाणे मसणात जाणे. 

*अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी. 

*अवचित पडे, नि दंडवत घडे. 

*अवसाबाई इकडे पुनवबाई तिकडे. 

*आधीच तारे, त्यात गेले वारे. 

*आग खाईल तो कोळसे ओकेल.

*आधणातले रडतात व सुपातले हसतात. 

*इच्छी परा ते येई घरा. 

*उराचे खुराडे आणि चुकीचे तुणतुणे. 

*उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी. 

*उकराल माती तर पिकतील मोती. 

*उधारीचे पोते सव्वा हात रिते. 

*उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे. 

*उसाच्या पोटी कापूस. 

*एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी. 

*एका खांबावर द्वारका. 

*एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला. 

*एका कानावर पगडी ,घरी बाईल उघडी. 

*करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते. 

*काडी चोर तो माडीचोर. 

*काजव्याचा उजेड त्याच्या अंगा भोवती. 

* कानात  बुगडी, गावात फुगडी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा