|
अमित |
अनसूया |
अबीर |
|
अंकित |
अंकुर |
अचूकपणा |
|
अंधूक |
अघटित |
अडीच |
|
अतिथी |
अद्भुत |
अधिक |
|
अधीक्षक |
अधीश |
अनुभूती |
|
अभूतपूर्व |
अमिष |
अमीर |
|
अमुक |
अर्जित |
अलगूज |
|
अक्रीत |
आगेकूच |
अहेर |
|
अतीत |
आजूबाजू |
इंजीन |
|
आधारित |
आमूलाग्र |
उंदीर |
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
शब्दातील ऱ्हस्व व दीर्घ इकार व उकार यांचा संभ्रम असणाऱ्या शब्दांचे लेखन.
रविवार, २६ जुलै, २०२०
चित्रपट- श्यामची आई
'पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे.'
"ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुचे हाती,
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती.''
या उक्ती ज्या पुस्तकाला तंतोतंत लागू ठरतात,गेली८४ वर्षे मराठी साहित्य नि मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पुस्तक म्हणजे संस्काराचा अमृतकुंभ,मातृप्रेमाचे महन्मंगल स्रोत 'श्यामची आई.'सानेगुरुजी नि श्यामची आई ही नावे ऐकली नाहीत असा मराठी माणूस असेल असे मला वाटत नाही. याच पुस्तकावर बहुआयामी व्यक्तिमत्त्व, साहित्य सम्राट आचार्य अत्रेंनी श्यामची आई चित्रपट निर्माण केला.त्याविषयी थोडेसे..
मराठीतील राष्ट्रपती पुरस्कार विजेता पहिला चित्रपट.आचार्य अत्रेंनी तन,मन,धन ओतून निर्माण केलेला हा चित्रपट.दामुण्णा जोशी, वनमाला नि बालकलाकार माधव वझे यांच्या प्रमुख भूमिका. 'छडी वाजे छमछम, भरजरीग पितांबर दिधला आणून, आई म्हणून कोणी' ही गाणी आजही मराठी मनाचा ठाव घेतात.
आचार्य अत्रे या अवलिया व्यक्तिमत्वाविषयी थोडेसे..
आचार्य अत्रे यांचा १३ जून हा पुण्यस्मरण दिन त्यानिमित्ताने या अवलिया व्यक्तिमत्वाविषयी थोडेसे..
एकावेळी दोन घोड्यावर मांड घालता येत नाही, एक ना धड भाराभर चिंध्या असे म्हटले जाते. पण हे खोटे ठरवणारा, हात लाविन त्याचे सोने करणारा, जाईल तिथे यशाचे गौरीशिखर गाठणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे साहित्यसम्राट, नाट्यलेखक,चित्रपट निर्माता, विडंबनकार, शिक्षण क्षेत्रात नवनिर्माण करणारा शिक्षणतज्ज्ञ, उत्तम राजकारणी, कवी, हजरजबाबी विनोदी लेखक नि लाखोंच्या सभा जिंकणारा फर्डा वक्ता म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे.
संत तुकाराम, लो.टिळक, डॉ.आंबेडकर, स्वा.सावरकर, रा.ग.गडकरी हे पाच महामानव अत्र्यांनी गुरू मानले. लेखणी आणि वाणीचे सामर्थ्य काय असते हे महाराष्ट्राने अत्र्यांच्या रूपाने पाहिले.'भलेतरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. 'यान्यायाने त्यांची लेखनी नि वाणी चालली. त्यांची व्यक्तिगत तत्वे, नि महाराष्ट्र हिताच्या आड कोणीही आला त्याला अत्र्यांनी सोडले नाही. प.नेहरू, आचार्य विनोबा, सावरकर, तर्कतीर्थ, लता मंगेशकर, यशवंतराव चव्हाण यांच्यावरही अत्र्यांनी बोचरी टिका केली.
सोमवार, २० जुलै, २०२०
मराठी भाषेतील काही शब्द उच्चार करताना (अयोग्य उच्चार) नि लेखन करताना वेगळे असतात. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. अशा शब्दांचे योग्य लेखन कोणते ? असा प्रश्न पडतो. असे काही शब्द..
|
|
अयोग्य शब्द |
योग्य शब्द |
|
1 |
आकरा |
अकरा |
|
2 |
अंमली |
अमली |
|
3 |
अखूड |
आखूड |
|
4 |
अजस्त्र |
अजस्र |
|
5 |
अतताई |
आततायी |
|
6 |
अद्यावत |
अद्ययावत |
|
7 |
अध्यात्मिक |
आध्यात्मिक |
|
8 |
अध्याऋत |
अध्याहृत |
|
9 |
आनुषंगिक |
|
|
10 |
अनुवंशिकता |
आनुवंशिकता |
शुक्रवार, १७ जुलै, २०२०
आठवणीचे मोरपीस...
दिवाळीला गावच्या वेशीवर थंडी येते असे म्हणतात. दिवाळी नि गुलाबी थंडी हे समिकरण ठरलेले. दिवाळी झाली की पूर्वी संध्याकाळी नि सकाळी गावात शेकोट्या पेटायच्या नि शेकोट्या भोवतीच्या गप्पा रंगायच्या. तसेच गावात भाऊबीजेपासून जणू सांस्कृतिक चळवळच सुरू व्हायची. ती म्हणजे मराठी चित्रपट, कोल्हापूरची म्युझिकल पार्टी. अंगापूर वंदन मध्ये मराठी शाळेच्या पाठीमागची जागा,बाजार पठांगण नि गणपती मंदिर तर अंगापूर तर्फ मध्ये बागेत ही ठिकाणे म्हणजे सिनेमाची ओपन थेयटरच.यापैकी जास्त सिनेमांसाठी सुरक्षित जागा (विना कनात लावता) म्हणजे मराठी शाळेचे मागचे पठांगण.पूर्वेकडील बाजूने दोन्ही इमारतीच्या मधील मोकळ्या जागेतून महिलांना प्रवेश व पश्चिमेकडून पुरुषांना प्रवेश एका बाजूने पूर्ण इमारत तर तिन्ही बाजूंनी इलायती शेराचे दाट कुंपण त्यामुळे घुसून जाणे हा विषयच नव्हता.
बुधवार, १५ जुलै, २०२०
बिस्त्या...
भाऊंच्या घरची लगीन घाई सरली होती. घरात पोराच्या लग्नाचा पहिलाच बार असल्यानं झाडून सारी पावणं रावळं नि भावकी जमली होती. सात-आठ पोरांच्यातलं पहिलंच लगीन असल्यानं वरमाय वरबापासह साऱ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. लग्नाच्या लगीन घाईत पायाला पाय नसताना डोक्यात अनेक विचारांची गर्दी असताना वरबाप असणाऱ्या भाऊंच्या डोक्यात मात्र दुसऱ्याच काळजीने घर केलं होतं. लग्नाइतकंच तिकडंसुद्धा मन घिरक्या घेत होतं. त्याच काय झालं असेल ? त्यो असंल का ? एवढं थांबल्यासारखं आजचा दिस तरी त्यानं थांबावं. देवाने त्याचं गाऱ्हाण ऐकलं होतं. लगीन पार पडलं. तो मात्र भाऊंची नि घरच्यांची वाट डोळ्यात प्राणआणून पाहत थांबला होता. लगीन उरकून घरी आल्या आल्या भाऊ लगबगीनं पह्यलं त्याच्याकडं गेलं. पाह्यलं, पापण्यांची उघडझाप चालू होती. अस्थिपंजर देह पडला होता. नकळत भाऊंच्या तोंडून शब्द बाहेर पडलं, 'कशातरं जीव अडकलाय ?'दोघ एकमेकाकड पाहत होती त्या डोळ्यात इमान होतं. आपुलकी होती, माया होती, प्रेम होतं नि कृतज्ञता होती.
तेथे कर माझे जुळती...
आज मराठी साहित्य शारदेचे सारस्वत, शब्दब्रह्म स्व.प्राचार्य शिवाजीराव भोसलेसर यांची जयंती. तीस वर्षांहून जास्त काळ विविध विषयांसह,महामानवांच्यां जीवनचरित्रांचा जागर आपल्या अमृतवाणीने मांडून वक्तृत्वाचा दीपस्तंभ निर्माण करणारे,'श्रवणेची होती जीभा,शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, माझा मराठाची बोलू कौतुके...' या माऊलींच्या शब्दांची अनुभूती ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्राला आली ते प्राचार्य शिवाजीराव भोसलेसर.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




