दिवाळीला गावच्या वेशीवर थंडी येते असे म्हणतात. दिवाळी नि गुलाबी थंडी हे समिकरण ठरलेले. दिवाळी झाली की पूर्वी संध्याकाळी नि सकाळी गावात शेकोट्या पेटायच्या नि शेकोट्या भोवतीच्या गप्पा रंगायच्या. तसेच गावात भाऊबीजेपासून जणू सांस्कृतिक चळवळच सुरू व्हायची. ती म्हणजे मराठी चित्रपट, कोल्हापूरची म्युझिकल पार्टी. अंगापूर वंदन मध्ये मराठी शाळेच्या पाठीमागची जागा,बाजार पठांगण नि गणपती मंदिर तर अंगापूर तर्फ मध्ये बागेत ही ठिकाणे म्हणजे सिनेमाची ओपन थेयटरच.यापैकी जास्त सिनेमांसाठी सुरक्षित जागा (विना कनात लावता) म्हणजे मराठी शाळेचे मागचे पठांगण.पूर्वेकडील बाजूने दोन्ही इमारतीच्या मधील मोकळ्या जागेतून महिलांना प्रवेश व पश्चिमेकडून पुरुषांना प्रवेश एका बाजूने पूर्ण इमारत तर तिन्ही बाजूंनी इलायती शेराचे दाट कुंपण त्यामुळे घुसून जाणे हा विषयच नव्हता.
शुक्रवार, १७ जुलै, २०२०
बुधवार, १५ जुलै, २०२०
बिस्त्या...
भाऊंच्या घरची लगीन घाई सरली होती. घरात पोराच्या लग्नाचा पहिलाच बार असल्यानं झाडून सारी पावणं रावळं नि भावकी जमली होती. सात-आठ पोरांच्यातलं पहिलंच लगीन असल्यानं वरमाय वरबापासह साऱ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. लग्नाच्या लगीन घाईत पायाला पाय नसताना डोक्यात अनेक विचारांची गर्दी असताना वरबाप असणाऱ्या भाऊंच्या डोक्यात मात्र दुसऱ्याच काळजीने घर केलं होतं. लग्नाइतकंच तिकडंसुद्धा मन घिरक्या घेत होतं. त्याच काय झालं असेल ? त्यो असंल का ? एवढं थांबल्यासारखं आजचा दिस तरी त्यानं थांबावं. देवाने त्याचं गाऱ्हाण ऐकलं होतं. लगीन पार पडलं. तो मात्र भाऊंची नि घरच्यांची वाट डोळ्यात प्राणआणून पाहत थांबला होता. लगीन उरकून घरी आल्या आल्या भाऊ लगबगीनं पह्यलं त्याच्याकडं गेलं. पाह्यलं, पापण्यांची उघडझाप चालू होती. अस्थिपंजर देह पडला होता. नकळत भाऊंच्या तोंडून शब्द बाहेर पडलं, 'कशातरं जीव अडकलाय ?'दोघ एकमेकाकड पाहत होती त्या डोळ्यात इमान होतं. आपुलकी होती, माया होती, प्रेम होतं नि कृतज्ञता होती.
तेथे कर माझे जुळती...
आज मराठी साहित्य शारदेचे सारस्वत, शब्दब्रह्म स्व.प्राचार्य शिवाजीराव भोसलेसर यांची जयंती. तीस वर्षांहून जास्त काळ विविध विषयांसह,महामानवांच्यां जीवनचरित्रांचा जागर आपल्या अमृतवाणीने मांडून वक्तृत्वाचा दीपस्तंभ निर्माण करणारे,'श्रवणेची होती जीभा,शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, माझा मराठाची बोलू कौतुके...' या माऊलींच्या शब्दांची अनुभूती ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्राला आली ते प्राचार्य शिवाजीराव भोसलेसर.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


